मंगळवेढा:-
सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी येथे घडलेल्या विहीर दुर्घटनेत आपल्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी टाकून ५ लोंकाचा जीव वाचवून देवदूत ठरलेल्या तांदुळवाडीच्या इरफान मुजावर याची वारी परिवाराने भेट घेवून शौर्याचे प्रतिक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन कौतुक करून सन्मान करण्यात आला.
जात,धर्म,पंथ यांचा विचार न करता इरफानने दाखवलेले धाडस,सेवाभाव आणि मानवतेचे दर्शन सध्याच्या युगात प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली असुन जाती पेक्षा माणूस आणि धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.अशा माणुसकी जपणाऱ्या व्यक्तींमुळेच समाजात आशेचा दिवा कायम तेवत राहतो आहे.
यासाठी वारी परिवाराने तांदुळवाडी येथे जाऊन इरफान मुजावर,तानाजी सुर्वे यांच्या धाडसाला,कर्तव्यभावनेला आणि मानवसेवेला मंगळवेढेकरांच्या वतीने सलाम करण्यासाठी अजय आदाटे,धनाजी घाडगे,प्रा.विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू यांनी कौतुक केले.
