इंधन वाचवा,देश वाचवा वारी परिवार सायकल क्लबची जनजागृती. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, १५ जून, २०२६

इंधन वाचवा,देश वाचवा वारी परिवार सायकल क्लबची जनजागृती.


मंगळवेढा:- 

इंधन बचत ही काळाची गरज आहे हा विषय घेऊन मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने मंगळवेढा-अरण-सोनारी या मार्गांवरून सायकल रॅली काढून इंधन वाचवा,देश वाचवाचा नारा देत जनजागृती करण्यात आली.


सद्यस्थितीत भारत सरकारने देशातील नागरिकांना आवाहन केले आहे की देशात जास्तीत जास्त लोंकानी गरजेपूरतेच वाहन वापरावे असे असताना वारी परिवाराच्या सायकल पट्टूनी मात्र प्रत्यक्ष कृतीतून २२७ किलोमीटर सायकलिंग करून इंधन बचतीचा संदेश दिला आहे.


सतत वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांना मोठा ताण येत असुन त्यावर मात करण्यासाठी दैनंदिन प्रवासात लोकांनी सायकलीचा वापर करणे हाच सर्वात उत्तम पर्याय आहे.


यासाठी वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने मंगळवेढा-पंढरपूर-आजोती-भोसे-करकंब-अरण-लऊळ-परांडा-सोनारी-कुर्डुवाडी-बावी-शेटफळ-आष्टी-रोपळे-बाबुळगाव-आढीव या मार्गांवर सायकल प्रवास करून जनजागृती केली आहे.


सध्या तरुणांचे अनावश्यक ठिकाणी टू व्हीलर आणि फोर व्हीलरवर फिरण्याचे प्रमाण वाढले असून मोठया प्रमाणावर पैशाचा अपव्यय होत आहे.


यासाठी तरुणांनी जास्तीत जास्त सायकलीचा वापर करून इंधनाची बचत करावी आणि देशात निर्माण झालेल्या इंधनाच्या संकटाचा मुकाबला करावा यासाठी वारी परिवार सायकल क्लबचे रायडर इंधन बचतीचा जागर घालीत प्रबोधनासाठी पुढे आलेले आहेत.


देशात इंधनाचा भासत असलेला तुटवडा लक्षात घेऊन वारी परिवाराने हाती घेतलेले कार्य खरोखरचं राष्ट्रीय संपत्तीची बचत करणारे असुन सर्व स्तरातून तसेच मार्गावरील प्रत्येक गावातून कौतुक होत आहे.


सदर जनजागृती रॅलीत प्रफुल्ल सोमदळे,नागेश डोंगरे,तानाजी हेंबाडे,राहुल सावंजी,भारत नागणे,सिद्धेश्वर डोंगरे,शरद हेंबाडे,रोहित नागणे,ओम डोंगरे,प्रा.विनायक कलुबर्मे यांनी सहभाग नोंदवत इंधन बचत,प्रदूषणमुक्त पर्यावरण,निरोगी जीवनशैलीचा संदेश आणि सायकलीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविले आहे.


यावेळी बळीराम व्यवहारे,औदुंबर व्यवहारे,सोनारी भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल दादा सावंत,प्रशासकीय अधिकारी सूर्यवंशी,हिंगलाज बेकरीचे विसानसिंग,जयंत पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

test banner