मंगळवेढा:-
मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने ६ जुन रोजी शिवतीर्थ येथे शिवराज्याभिषेक दिन मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला.
सुरवातीस सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या माजी अध्यक्षांच्या वतीने शिवमुर्तीवर दुग्धभिषेक करण्यात आला. तसेच पाच प्रकारचे धान्य,नाण्याचा अभिषेक करून पुषवृष्टी करण्यात आली.
याप्रसंगी ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र घेवून शिवरायांना अभिवादन करुन राज्याभिषेक सोहळानिम्मित पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला तर गारद देऊन जयघोष करण्यात आला.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विविध पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.
