मंगळवेढा-पंढरपूर पालखी महामार्गावरील वृक्षांचा सातवा वाढदिवस साजरा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, ५ जून, २०२६

मंगळवेढा-पंढरपूर पालखी महामार्गावरील वृक्षांचा सातवा वाढदिवस साजरा.


मंगळवेढा:- 

वारी परिवार व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने हभप शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा-पंढरपूर हरित पालखी महामार्गावर पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2019 रोजी लावण्यात आलेल्या झाडांचा सातवा वाढदिवस मोठ्या आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.


सध्याच्या काळात एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा वृक्षांचा वाढदिवस साजरा करणे ही आदर्शवत संकल्पना रुजवित वारी परिवाराचा ५ जून पर्यावरण दिन साजरा होत असतो.


सुरवातीस पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे व आगार प्रमुख गुरुनाथ रणे यांच्या हस्ते वृक्षांचे पूजन करून सेंद्रीय खतापासून तयार केलेला केक कापून वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


यावेळी दत्तात्रय बोरिगिड्डे म्हणाले आपण जसे लहान मुलांचे वाढदिवस साजरा करतो तसे वृक्षांचे वाढदिवस साजरा करणे काळाची गरज आहे वृक्ष जगले तरच मानव जात जिवंत राहणार आहे यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची मंगळवेढयातुन वारी परिवाराने सुरू केलेली संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली पाहिजे असे मत व्यक्त केले.


यावेळी गुरुनाथ रणे म्हणाले प्रत्येक झाड मानवाला ऑक्सिजन देते आज झाडे नष्ट झाली तर पुढे मानवाला ऑक्सिजन मिळणार नाही त्यामुळे आपला वाढदिवस होऊ शकणार नाही आणि म्हणूनच स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन हाच एकमेव पर्याय असून झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आदर्शवत आहे वाढते तापमान कमी करायचे असेल तर वृक्ष लागवड हाच पर्याय आहे.


याप्रसंगी झाडे लावा,झाडे जगवा पर्यावरण वाचवा असा संदेश देण्यात आला प्रत्येक झाडांना लावलेले रंगीबेरंगी फुगे,रांगोळी,फुलांची सजावट विशेष लक्ष वेधून घेत होते या कार्यक्रमासाठी दत्तात्रय भुसे,भरत राजपुरोहित,नंदकुमार साळुंखे, मारुती जाधव,रविराज जाधव,संजीवनी फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले.


यावेळी मल्लया स्वामी,चंगेजखान इनामदार,सिद्धेश्वर शिंदे,दत्तात्रय भोसले,सुजीत मुदगुल,रतिलाल दत्तू,विठ्ठल बिले,प्रफुल्ल सोमदळे,चंद्रकांत चेळेकर,भारत नागणे,स्वप्नील फुगारे,अवीनाश जाधव,सतिश उन्हाळे,नागेश डोंगरे परमेश्वर पाटील,माणिक गुंगे,विष्णू भोसले,पांडुरंग नागणे,सुनील लेंडवे,प्रकाश खंदारे,राहुल आवताडे,सिद्धेश्वर जाधव,रविकिरण जाधव,गणेश मेहरकर,गणेश मोरे,सतिश दत्तू यांचेसह वारी परिवाराचे सर्व सदस्य,चालक- मालक मोटर संघटनेचे सदस्य,निसर्ग प्रेमी नागरिक उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.विनायक कलुबर्मे यांनी केले.

test banner