मंगळवेढा:-
मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाची पदाधिकारी निवडी संदर्भात मुलाखती पार पडल्या.या मुलाखती जिल्हाध्यक्ष मा.वसंत (नाना) देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व पक्षाचे निरीक्षक मा.महादेव तळेकर साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
मंगळवेढा तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष व सर्व शेलच्या संदर्भात मुलाखती घेण्यात आल्या.या मुलाखतीमध्ये मोठ्या प्रमाणात पवार साहेबांच्या विचारावरत आजी माजी पदाधिकारी व शरद पवार यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरद पवार यांच्या विचाराशी एकनिष्ठ असलेले, गोणेवाडी गावचे सुपुत्र मा.माणिक गुंगे सर गेले अनेक वर्ष पवार साहेबांच्या विचाराचे एकनिष्ठ आहेत.पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सर्वसामान्य जनतेची कामे करण्याचा प्रयत्न केला आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेमध्ये खाऊ वाटप तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप हे त्यांनी केले आहे.
तसेच गोणेवाडी व शिरशी या गावात गेली पंधरा ते वीस वर्षे एसटी नव्हती विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची समस्या मोठ्ठ्या प्रमाणात होती परंतु माणिक गुंगे यांनी सहा महिने प्रयत्न करून आज शिरशी व गोणेवाडी या गावाला एसटी सुरू केली.
मंगळवेढा तालुक्या मध्ये माणिक गुंगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत व शरद पवार यांच्या सोबत कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत.दोन वेळेस ते तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते.परंतु काही कारणास्तव त्यांना पदापासून दूर राहावं लागलं.आता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब व जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांच्या वरती संपूर्ण विश्वास आहे.
याआधी त्यांनी अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले व त्यानंतर तालुका कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
या कामाच्या पोचपावती वरून मंगळवेढा तालुका अध्यक्ष पदी माणिक गुंगे यांची निवड व्हावी असे मंगळवेढा तालुक्यातील जनतेतून तसेच कार्यकर्त्यांमधून त्यांच्या नावाची पसंती दाखवण्यात आली आहे.

