मंगळवेढा शहरात अवजड वाहतूकी विरोधात गांधीगिरी आंदोलन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शुक्रवार, २२ मे, २०२६

मंगळवेढा शहरात अवजड वाहतूकी विरोधात गांधीगिरी आंदोलन.


मंगळवेढा:-

मंगळवेढा शहरातून होत असलेल्या अवजड वाहतुक थांबवण्यासाठी दोन कमानी उभ्या करण्याबाबत वारंवार निवेदन व पाठपुरावा करून देखील कारवाई होत नाही.याच्या विरोधात गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.


शुक्रवारी सकाळी 10.00 वाजता दामाजी चौक येथे शहरातून जात असलेल्या अवजड वाहतुकीच्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देण्यात आले.


तसेच सकाळी 11:00 वाजता मंगळवेढा नगरपरिषदेमधील संबंधित अधिकाऱ्यांना बदाम भेट देण्यात आले जेणेकरून त्यांना आपली कामे लक्षात रहावी यासाठी त्यांची स्मरणशक्ती वाढावी व नगरपरिषदेकडे आलेल्या निवेदनांचा पाठपुरावा करून कामाला गती मिळावी यासाठी त्यांना बदाम भेट देण्यात आले. 


यावेळी यापुढे अवजड वाहतुकीमुळे नागरीकाचा बळी गेल्यास संबंधित अधिकाऱ्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असे उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.


मंगळवेढा नगरपरिषदेमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी व अनेक विभागांचे प्रमुख अधिकारी यांच्या जागा रिक्त असल्यामुळे अनेक समस्यांचा सामना सामान्य नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेसंदर्भातील  अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.


सदर आंदोलनामध्ये नारायण गोवे,मारूती वाकडे,मल्लय्या स्वामी,क्रांती दत्तू,बापु मेटकरी,राजवीर हजारे,सतीश दत्तू,अजय आदाटे,सय्यद इनामदार,अमोल मोरे,चंद्रकांत जाधव,प्रफुल्ल सोमदळे,स्वप्नील टेकाळे,रविराज जाधव,अविराज जाधव,गणेश मेहेरकर यांच्यासह अनेक जागरूक नागरिकांनी सहभागी होते

test banner