जवाहरलाल शेतकी हायस्कूलची यशाची परंपरा कायम; हा विद्यार्थी प्रशालेत प्रथम. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १० मे, २०२६

जवाहरलाल शेतकी हायस्कूलची यशाची परंपरा कायम; हा विद्यार्थी प्रशालेत प्रथम.


मंगळवेढा:-

आत्ता जाहीर झालेल्या 10 च्या निकाला मध्ये जवाहरलाल हायस्कूल ने आपली यशाची परंपरा देखील कायम ठेवली आहे.


यंदा प्रशालेचा निकाल 91.48%लागला आहे.यामध्ये सुमित संतोष दुधाळ याने 93.40%गुण मिळवून प्रशालेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.


तसेच श्रुती दादासो बाबर हिने 92.80%गुण मिळवून प्रशालेत द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे तर सई गणेश यादव हिने 90.20%गुण मिळवून तृतीय येऊन घवघवीत यश संपादन केले आहे.


तसेच राजानंदिनी किरण चव्हाण,शौर्य प्रशांत शहा,सुमित सिद्धेश्वर माळी, कांदबरी विष्णुपंत माने,पूर्वा सचिन बडोदकर यांनी 80% पेक्षा जास्त मार्क पाडून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.


विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व शैक्षणिक विकासासाठी व प्रगतीसाठी प्रशालेच्या वतीने राबवण्यात येणारे उपक्रम व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच यशाचा डंका सर्व दूर वाजला.


संस्थेचे सर्व सदस्य मुख्याध्यापक शंकर नाना आवताडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

test banner