मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी नारी शक्तिची गर्जना. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ९ एप्रिल, २०२६

मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी नारी शक्तिची गर्जना.


मंगळवेढा:-

लोकशाहीचे खरे जनक जगदज्योती महात्मा बसवेश्वरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक झालचं पाहिजे अशी गर्जना देऊन मंगळवेढ्यातील नारी शक्ती एकवटली आहे.


महात्मा बसवेश्वर स्मारक प्रबोधन सप्ताहानिमित्त मंगळवेढ्यात महिलांची प्रबोधन पदयात्रा काढण्यात आली.


मंगळवेढ्यात स्मारकाची मागणी जोर धरत असताना आता मात्र महिला भगिनी रस्त्यावर उतरून एकजुटीने हा लढा पुढे घेऊन जात आहेत.


दामाजी मंदिरापासून सुरु झालेल्या पदयात्रेत शिवप्रेमी चौक,चोखामेळा चौक,मुरलीधर चौक,शनिवार पेठ आदी मार्गांवर प्रबोधन जनजागृती करण्यात आली.


यावेळी पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी स्मारक झालचं पाहिजे,छोटे-मोठे उद्योग सुरु होण्यासाठी स्मारक झालचं पाहिजे.


रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी स्मारक झालचं पाहिजे,अर्थ व्यवस्थेला बळकटी येण्यासाठी स्मारक झालचं पाहिजे,सामाजिक व सांस्कृतिक देवाण घेवाण होण्यासाठी स्मारक झालचं पाहिजे,भविष्यात रेल्वे व विमानसेवा सुरु होण्यासाठी स्मारक झालचं पाहिजे,विदेशातील लोक अभ्यासाला येण्यासाठी  स्मारक झालचं पाहिजे असे संदेश देणारे फलक व बसवेश्वरांच्या वेशभूषेतील लहान मुले सर्वांचे लक्ष वेधक आकर्षक ठरले.


यावेळी महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

test banner