मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारक संकल्प मेळावा संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १२ एप्रिल, २०२६

मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारक संकल्प मेळावा संपन्न.


मंगळवेढा, प्रतिनिधी:-

मंगळवेढा येथे रविवारी १२ एप्रिल २०२६ रोजी वीरशैव मंगल कार्यालय,पंढरपूर रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारक प्रबोधन सप्ताहांतर्गत संकल्प मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या मेळाव्यात आमदार समाधान दादा आवताडे यांनी “मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वरांचे भव्य स्मारक उभारणारच” असे ठाम आश्वासन देत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक कलुबर्मे यांनी करत स्मारकाच्या गरजेवर प्रकाश टाकला.विजय बुरकुल यांनी बसवेश्वर स्मारक कसे असावे याबाबत सविस्तर माहिती देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.


यावेळी माजी नगराध्यक्ष अरुणाताई माळी व पंचायत समिती सदस्या जयश्रीताई कवचाळे यांनी आपले विचार व्यक्त करत महिलांमध्येही स्मारक उभारणीबाबत तीव्र इच्छा असल्याचे स्पष्ट केले.


तसेच शिवानंद पाटील व मल्लया स्वामी यांनी ग्रामस्थांच्या भावना व्यक्त केल्या.भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या कार्यकाळात राहिलेला हा विषय लवकरात लवकर पूर्ण करून बसवेश्वर स्मारक उभारावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमात सतीश दत्तू यांनी उपस्थित मंगळवेढेकरांना बसवेश्वर स्मारकासाठी प्रतिज्ञा देत “स्मारक लवकरात लवकर उभारण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन प्रयत्न करावेत” असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मोगले व आभार प्रदर्शन अजय आदाटे यांनी केले.सदर कार्यक्रमास बहुसंख्य मंगळवेढेकर उपस्थित होते

test banner