मंगळवेढा:-
सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक जगदज्योती महात्मा बसवेश्वरांचे मंगळवेढ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा रहावे यासाठी नागरिकांची जनजागृती व्हावी म्हणून मंगळवेढेकरांनी हाती क्रांतीची मशाल पेटवत मशाल घेऊ हाती,स्मारकलादेऊ गती अशी हाक दिली.
कर्मभूमी असलेल्या मंगळवेढ्यात बसवेश्वरांचे भव्य स्मारक व्हावे या मागणीसाठी सुरु असलेल्या प्रबोधन सप्ताहात मशाल रॅली काढण्यात आली.
मंगळवेढ्यातील रामलिंग मंदिरापासून सुरु झालेली मशाल रॅली कुंभार गल्ली-बोराळ वेस-खंडोबा गल्ली-नागणे गल्ली-दामाजी चौक-शिवप्रेमी चौक-चोखामेळा चौक-मुरलीधर चौकातून शनिवार पेठेत गोविंद बुवा मंदीरात शेवट करण्यात आला.
यावेळी प्रबोधन पर पत्रके वाटत पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी महात्मा बसवेश्वर स्मारक झालच पाहिजे मंगळवेढ्याच्या सौदंर्यात भर पडण्यासाठी महात्मा बसवेश्वर स्मारक झालच पाहिजे.
छोटे मोठे उद्योग सुरु होण्यासाठी महात्मा बसवेश्वर स्मारक झालच पाहिजे.
रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महात्मा बसवेश्वर स्मारक झालच पाहिजे.
अर्थ व्यवस्थेला बळकटी येण्यासाठी महात्मा बसवेश्वर स्मारक झालच पाहिजे.
विचारांची ज्योत पेटवूया बसवेश्वरांचे स्मारक उभे करूया अशा घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली.
