मंगळवेढा शहरात डास व कुत्र्यांचा नागरिकांना नाहक त्रास. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २९ एप्रिल, २०२६

मंगळवेढा शहरात डास व कुत्र्यांचा नागरिकांना नाहक त्रास.


मंगळवेढा:-

मंगळवेढा शहरात वाढत्या डासांच्या प्रादुर्भावामुळे आणि भटक्या कुत्र्यांच्या त्रासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या गंभीर परिस्थितीविरोधात अखेर ठोस पाऊल उचलत स्वच्छता विभागाला निवेदन देण्यात आले असून,आरोग्य सभापती प्रविण खवतोडे यांच्याकडे तातडीने कारवाईची करण्याचे आदेश दिले आहेत.


आरोग्य प्रशासनाने आजपासूनच प्रत्यक्ष उपाययोजना सुरू करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे.


शहरातील अनेक भागांत डासांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे मलेरिया,डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.



त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिक, विशेषत लहान मुले,महिला व ज्येष्ठ नागरिक भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती.


या पार्श्वभूमीवर दिलेल्या निवेदनाची दखल घेत आरोग्य विभागाने आठवड्यातून एकदा ज्या भागात गटारीची स्वच्छता केली जाते तेथे फॉगिंग मोहीम व बीएससी पावडर टाकण्यात येणार डास नियंत्रणासाठी औषध फवारणी केली जाणार तसेच मोकाट कुत्र्यांच्या समस्येसाठी एक महिन्याच्या आत डॉग शेल्टर उभारून लसीकरण केले जाणार आहे.


स्वच्छता मोहीम आणि भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी विशेष पथक कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले आहे.प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


यावेळी नगरसेवक सोमनाथ भुई,सोमनाथ बुरजे,वारी परिवाराचे अध्यक्ष सतिश दत्तू,अजय अदाटे, प्रफुल्ल सोमदळे नगरपरिषद आरोग्य अधिकारी अनिकेत चंदनशिवे,बंडोपंत मणेरी उपस्थित होते.


सर्वांनी एकमुखाने “स्वच्छ मंगळवेढा, सुंदर मंगळवेढा” या संकल्पनेला बळ देत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.


दरम्यान, प्रशासनाच्या या आश्वासनानंतर प्रत्यक्षात किती जलद आणि प्रभावी कारवाई होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने कोणतीही दिरंगाई न करता ठोस पावले उचलणे अत्यावश्यक ठरणार आहे.

test banner