मंगळवेढा (प्रतिनिधी) –
वारी परिवार सायकल क्लब,मंगळवेढा यांच्या वतीने रविवारी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या समर्थनार्थ मंगळवेढा-मरवडे-हुलजंती-सलगर खुर्द-सलगर बुद्रुक-जंगलगी-बावची-जित्ती-खवे-येड्राव-मंगळवेढा अशी ६५ किलोमीटर सायकल राईड काढण्यात आली.
यावेळी सर्वच गावात ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळाला सदर सायकल राईड मधून स्मारकाच्या उभारणीत मंगळवेढेकर म्हणून आपली काय जबाबदारी आहे याची माहिती देण्यात आली.
यावेळी सलगर बुद्रुक येथे सर्व सायकल पट्टूचे जोरदार स्वागत करण्यात आले तसेच महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातून फेरी काढण्यात आली.
बसवेश्वर स्मारक झालेच पाहिजे,वर्ग करा वर्ग करा स्मारकाची जागा वर्ग करा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. लोकांनीच उभ्या केलेल्या स्मारकाच्या लढ्यासाठी प्रत्येक गाव एकजुटीने आहे असा विश्वास देखील ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
तसेच लवकरात लवकर स्मारकाची नियोजित जागा समितीकडे वर्ग व्हावी आणि निधीची तरतूद करून काम सुरु व्हावे असा नारा देखील देण्यात आला वारी परिवार सायकल क्लबने मागील रविवारी देखील डोंगरगाव,हाजापूर,भाळवणी,खोमनाळ अशी सायकल राईवड काढून समर्थन दर्शविले होते.
यावेळी सलगर येथील देवानंद हिरेमठ तर खवे येथील संग्राम दुधाळ यांचे विशेष सहकार्य लाभले .
या उपक्रमात सायकल क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे,अविनाश जाधव,प्रफुल्ल सोमदळे,पांडुरंग कोंडुभैरी,तानाजी हेंबाडे,राहुल सावंजी,रविराज जाधव,सचिन साळुंखे, सिद्धेश्वर डोंगरे,प्रा.विनायक कलुबर्मे,सतीश दत्तू आदी सहभागी होते.

