मंगळवेढ्यातील प्रसिद्ध 'जय भवानी तरुण मंडळ' साजरा करणार ५८वा वर्धापन दिन: विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

मंगळवेढ्यातील प्रसिद्ध 'जय भवानी तरुण मंडळ' साजरा करणार ५८वा वर्धापन दिन: विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन



मंगळवेढा प्रतीनिधी :

मंगळवेढा शहरातील आणि तालुक्यातील लोकांचे श्रद्धास्थान असलेले "जय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ" आपला ५८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहे. या निमित्ताने मंडळाने मंगळवार, दिनांक ०१ मे २०२६ रोजी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.अशी माहिती मंडळाचे सचिव श्री. दत्तात्रय सावंत यांनी दिली 

गेल्या ५७ वर्षांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या या मंडळाने यंदाही भरगच्च कार्यक्रमांची आखणी केली आहे. वर्धापन दिनाची सुरुवात पहाटेच्या मंगल वातावरणात पवित्र धार्मिक विधींनी होणार आहे.

दिवसभराचे कार्यक्रम:

त्यानंतर, संध्याकाळी ०७:३० वाजता, श्री भवानी मातेची भव्य महापुजा संपन्न होईल. ही महापुजा पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. समाधानदादा आवताडे यांच्या शुभहस्ते आणि मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

त्यानंतर सकाळी ठीक ०७:३० वाजता, मंडळाच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे.

महापुजेनंतर, उपस्थित भाविकांना भक्तीरसात न्हाऊन काढण्यासाठी 'देविंच्या गीतांचा' एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सोलापूर येथील नामांकित संच, "आदिशक्ती इंद्रभवानी गोंधळ पार्टी", सादर करणार आहे.

या पवित्र दिवसाचे औचित्य साधून, मंडळाने आपल्या सामाजिक बांधीलकीची परंपरा जपली आहे. महाप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमानंतर, रात्री ०८:०० वाजता, गोपाळपूर येथील वृद्धाश्रम मध्ये सर्व आजी-आजोबांसाठी स्नेहभोजन चे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील उपेक्षित घटकांना या उत्सवात सहभागी करून घेण्याचा मंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते या उत्सवासाठी गेली काही दिवस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. सर्व कार्यक्रमांचे ठिकाण चोखामेळा चौक, मंगळवेढा येथील जय भवानी देवीचे मंदिर हे आहे.

मंडळाच्या वतीने, वर्धापन दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून श्री भवानी मातेचा आशीर्वाद घेण्याचे आणि कार्यक्रमांची शोभा वाढवण्याचे आवाहन सर्व मंगळवेढेकर ग्रामस्थ आणि माता-भगिनींना करण्यात मंडळाकडून करण्यात आले आहे.

test banner