प्रतिनिधी
मंगळवेढा शहरांमध्ये सोमवार दि . १३ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता विश्वमंगल मराठी फाऊंडेशन”च्या विचारमंथन बैठकीस लोकमंगल परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार तथा माजी सहकार मंत्री मा श्री . सुभाष बापू देशमुख साहेब यांनी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था शाखा - मंगळवेढा येथे उपस्थित राहून या बैठकीदरम्यान उपस्थित मान्यवरांशी सविस्तर संवाद साधत फाऊंडेशनच्या दूरदृष्टीपूर्ण उद्दिष्टांवर आणि भविष्यातील वाटचालीवर सखोल चर्चा करण्यात आली.
“उद्योजक घडला तरच रोजगार निर्माण होतो” हा मूलभूत ध्यास घेऊन कार्यरत असलेली ही पूर्णतः नॉन-प्रॉफिट संस्था आहे. स्थानिक पातळीवरून जागतिक स्तरापर्यंत मराठी उद्योजकतेचा विस्तार करत, मराठी संस्कृतीची जपणूक आणि तिच्या सामर्थ्याला नवी दिशा देण्याचा संकल्प या माध्यमातून अधोरेखित करण्यात आला आहे. १ मे रोजी आळंदी येथे उद्घाटन समारंभ होणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले .
“लोकमंगल” परिवाराच्या तीन दशकांच्या भक्कम सामाजिक वारशावर उभे असलेले हे व्यासपीठ विश्वास, पारदर्शकता आणि संघटित प्रयत्नांच्या बळावर विकेंद्रीत पद्धतीने कार्यरत राहणार आहे. उद्योग, रोजगार आणि सामाजिक विकास यांचा समन्वय साधणारी ही चळवळ निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
सोलापूरमधील युनिफॉर्म गारमेंट उद्योगाच्या अडचणींवर उपाय म्हणून केलेले प्रयत्न, वाराणसीपर्यंत विस्तारलेली उद्योगप्रदर्शनांची वाटचाल तसेच उद्योजकांना दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्याचे यशस्वी उपक्रम याची दखल देशपातळीवर घेतली जाणे ही अभिमानास्पद बाब आहे.
आज गरज आहे ती आपल्या मातीत राहून उद्योग उभारण्याची, स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्याची, शाळांचा दर्जा उंचावण्याची आणि आपल्या मराठी संस्कृतीचा जागतिक स्तरावर ठसा उमटवण्याची. “विश्वमंगल” या नावामागील हीच प्रेरणा अधिक व्यापक होत आहे.
मराठी माणसाला जगाच्या कानाकोपऱ्यात एकत्र आणत, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक मजबूत व्यासपीठ उभारण्याचा हा संकल्प आपण सर्वांनी मिळून यशस्वी करूया, असा ठाम विश्वास बापूसाहेबांनी व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नेते श्री . संजय चेळेकर यांनी केले . यावेळी प्रा . श्री . दौलतसिंग राजपूत , भालेवाडीचे सरपंच श्री . श्रीकांत दवले ,वारी परिवाराचे अध्यक्ष श्री सतीश दत्तू , इंग्लिशस्कूलचे उपमुख्याध्यापक श्री .सुनिल नागणे सर , योग शिक्षक श्री . संतोष दुधाळ सर , कल्पतरू परिवाराचे श्री . हरीभाऊ यादव ,शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री . संभाजी तानगावडे सर , दामाजी शिक्षक सोसायटीचे चेअरमन श्री . प्रदीप यादव सर , व्हा चेअरमन श्री धर्मराज जाधव सर, सूत्रसंचालक श्री .बालाजी शिंदे सर व दामाजी शिक्षक सोसायटीचे संचालक मंडळ आदींसह शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार श्री . दत्तात्रय येडवे सर यांनी मानले .

