मंगळवेढ्यातील सायकलस्वारांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

मंगळवेढ्यातील सायकलस्वारांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अनोखे अभिवादन.


मंगळवेढा:-

येथील वारी परिवार सायकल क्लबमधील सायकलस्वारांकडून मंगळवेढा-पंढरपूर-मंगळवेढा अशी सायकल राईड काढून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.


दि १४ एप्रिल रोजी १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून वारी परिवार सायकल क्लबच्या सदस्यांनी पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.


तसेच मंगळवेढा येथील दोन्ही जयंती उत्सव मंडळाच्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यावरण प्रेमी होते अशा महापुरुषास त्यांच्याच विचारातून नमन करण्यासाठी ५० किलोमीटर सायकलिंग करून खरोखरच कृतियुक्त आणि  प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आहे.



यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,हर घर संविधान,घर घर संविधानचा नारा देत महाराष्ट्र सरकारच्या घर घर संविधान उपक्रमाचा जागर घालण्यात आला.


 जयघोषाबरोबरच आज पर्यावरण रक्षण करणे सुद्धा आपली जबाबदारी आहे असा संदेश देखील देण्यात आला.यावेळी जयंती उत्सव मंडळाचे पंकज पराध्ये,अजय गाडे यांनी सर्व रायडर्सचे स्वागत केले.


या अभिवादन सायकल राईडमध्ये सागर लंगोटे,राहुल सावंजी,चंद्रजित शहा,प्रफुल्ल सोमदळे,नंदकुमार नागणे,नागेश डोंगरे,रवि जाधव,अविनाश जाधव,राहुल बनसोडे,विवेक वाले,कमलेश माळी,डॉ.राहुल शेजाळ,प्रा विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू आदी यांनी सहभागी होते.

test banner