यूपीएससी परीक्षेतील उज्वल यशाबद्दल श्री .मनोज पाटील यांचा शिक्षक संघाच्या वतीने सत्कार संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, ८ मार्च, २०२६

यूपीएससी परीक्षेतील उज्वल यशाबद्दल श्री .मनोज पाटील यांचा शिक्षक संघाच्या वतीने सत्कार संपन्न.



प्रतिनिधी:

केंद्रीय लोकसेवा

आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालीहाळ या छोट्याशा खेडेगावातील मा.मनोज रामचंद्र पाटील या सिव्हिल इंजिनिअर पदवी घेतलेल्या तरूणाने देशात ४९३ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. मनोजने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर हे यश मिळवून आई-वडिलांचे 'घरात एक क्लास वन अधिकारी व्हावा' हे स्वप्न साकार केले.

       विशेष म्हणजे मनोज पाटील हे मंगळवेढा तालुक्यातील जालीहाळ या गावातील सोलनकरवाडी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहेत. मनोज पाटील हे 

सांगली बँकेचे तज्ञ संचालक व आदर्श शिक्षक समितीचे नेते श्री . श्रीमंत पाटील गुरुजी यांचे पुतणे आहेत.

   या उत्तुंग यशाबद्दल मा.मनोज पाटील यांचा व वडिल सेवानिवृत्त शिक्षक श्री रामचंद्र पाटील सर आणि आई येसुबाई यांचा जालिहाळ येथे त्यांचे घरी जाऊन शिक्षक संघ व गुरूसेवा परिवाराच्या वतीने सत्कार करून आनंदाचा क्षण साजरा केला.

   यावेळी राज्य संघाचे सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक संजय चेळेकर, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस तथा तालुका अध्यक्ष संभाजी तानगावडे, सांगली बँकेचे तज्ञ संचालक श्रीमंत पाटील, पदवीधर संघटनेचे नेते दत्तात्रय येडवे, जिल्हा संघाचे उपाध्यक्ष विष्णू आसबे व दादासाहेब इंगोले सर व पाटील परिवार उपस्थित होता.



test banner