मंगळवेढा:-
मंगळवेढा येथील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी पर्यावरण रक्षणार्थ मंगळवेढा ते जत पक्षी वाचवा सायकल अभियानाचे आयोजन केले असल्याचे वारी परिवार सायकल क्लबचे अध्यक्ष स्वप्निल टेकाळे यांनी सांगितले.
सध्या उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे निसर्गातील मुक्त संचार करणाऱ्या पक्षांना चारा व पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
तसेच चारा पाण्याविना पक्षी मरण पावत आहेत अशा पक्ष्यांच्या रक्षणासाठी लोकांनी आपल्या घरावरती शेतामध्ये ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे चारा व पाणी ठेवून पक्षांना आधार देण्यासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे पाण्याचा अतिरेक वापर करून रंगपंचमी साजरी करण्यापेक्षा पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करा हा देखील संदेश देण्यात येणार आहे.
सदर सायकल अभियानात जत येथील यल्लमा आणि अंबाबाईचे दर्शन देखील घेण्यात येणार आहे. उन्हाळ्यात पक्षांना चारा आणि पाणी ठेवणे ही आपली प्रत्येकाची महत्त्वाची जबाबदारी असुन पक्षांना जीवदान देण्यासाठी भक्ती,सेवा आणि पर्यावरण संवर्धन यासाठी हाती घेतलेल्या अभियानाचे विशेष कौतुक होत आहे.
