मंगळवेढा:-
एक दिवस गावासाठी या मोहिमेअंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बोराळे नाका येथे नियोजित असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर व कुंभार तलाव परिसराची स्वच्छता करण्यात आली.
यामध्ये परिसरातील पालापाचोळा,प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या रिकाम्या बाटल्या,वाळलेले गवत एकत्रित करण्यात आले व मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने कचरा उचलण्यात आला.
महिला दिनानिमित्त स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या महिलांना जागर स्त्रीशक्तीचा,शिवराय संस्कार व शिक्षण,स्वराज्य माता जिजाऊ,शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन ही पुस्तके व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
महिलांना प्रेरणास्थान असलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा लवकरात लवकर उभा करून शेजारील जागेत अहिल्या शिल्पसृष्टी उभा करण्यात यावी अशी उपस्थित महिलांच्या वतीने मागणी करण्यात आली.
सदर स्वच्छता मोहिमेमध्ये नगरसेविका मनीषा मेटकरी,प्रभाताई कोकरे,अर्पिता ठोंबरे,क्रांती दत्तू, निर्मला जाधव,निकिता जाधव,उज्वला दत्तू,आदिती साळुंखे,नगरसेवक प्रवीण खवतोडे,अनिल बोदाडे माजी सैनिक संघटनेचे बाळासाहेब पवार,मल्लय्या स्वामी,चंगेजखान इनामदार,कृष्णा पडवळे,दत्तात्रय सावंत,बाबासाहेब माने,राजू आडके,सय्यद इनामदार,महादेव गांडुळे,दयानंद गायकवाड,अविनाश मेटकरी,दामाजी मेटकरी,नितीन मेटकरी,दगडू ठोंबरे,खंडू कोकरे,बालाजी दोलतोडे,आदेश मेटकरी,दत्तात्रेय भोसले,समाधान हेंबाडे,सुजित मुदगुल,सागर राऊत,दत्तात्रय घोडके,राजवीर दत्तू,रणवीर दत्तू ,सतीश दत्तू यांनी सहभाग नोंदविला.
