प्रतिनिधी:
मंगळवेढा शहरात शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित शहरस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नगरपालिका कन्या शाळा क्रमांक १ ने पुन्हा एकदा आपला डबल डंका वाजवला आहे. शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गटांत प्रथम क्रमांक पटकावत शाळेचा नावलौकिक उंचावला.पहिली-दुसरी गटातून श्रीरंग गणपती पवार याने प्रभावी, आत्मविश्वासपूर्ण आणि ओघवत्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर भाष्य करत परीक्षकांची मने जिंकली. त्याच्या ठाम आवाजात आणि स्पष्ट मांडणीतून उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.तसेच तिसरी-चौथी गटातून शरयू अतुल सावंजी हिनेही उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य सादर करत दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला. शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग प्रभावी शैलीत मांडत तिने आपल्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.दोन्ही विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांच्या प्रोत्साहनामुळे हे यश संपादन केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा मा .सौ. सुनंदा ( आबी ) आवताडे व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण समितीचे सभापती मा . श्री सोमनाथ आवताडे व शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी श्री बिभीषण रणदिवे, मुख्याध्यापक राजकुमार मांजरे ,संजय चेळेकर , मारूती दवले , आशा वाले ,निंगापा कोळी , भारती धनवे उपस्थित होते . सर्वांनी आपल्या मनोगतात बोलताना या वक्तृत्व स्पर्धाच्या उपक्रमाचे कौतुक करून स्पर्धा संयोजक अर्जुन आवताडे सर व चंद्रकांत देसाई सर यांना विशेष धन्यवाद देऊन विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या . या वेळी परीक्षक म्हणून पंढरपूरचे डॉ . प्रशांत ठाकरे व संतोष कवडे सर यांनी काम पाहिले .
या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेला नवा मान मिळाला आहे.या यशाबद्दल शाळेच्या वतीने दोन्ही विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.शिवजन्मोत्सवाच्या या स्पर्धा निमित्ताने मिळालेले हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून नगरपालिका कन्या शाळा क्र. १ ची शहरातील गुणवत्तापूर्ण शिक्षणातील उंचावलेल्या आलेखाची सर्वत्र होत आहे .

