मंगळवेढा:-
मंगळवेढा शहरात अंदाजे 200 इमारती पडक्या अवस्थेत आहेत.त्यामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत पडक्या इमारतीमध्ये कुत्र्यांना नवीन पिले जन्म घालण्यास जागा उपलब्ध होते.
त्यामुळे शहरात कुत्र्यांचा सुसळाट झालेला आहे त्यांनी आतापर्यंत अनेकांचा चावा घेतलेला आहे. वाढलेल्या कुत्र्यांच्या संख्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
पडक्या इमारतीमध्ये घुशी,उंदरे,डास, साप यांना निवारा मिळाल्यामुळे शहरांमध्ये त्यांचे प्रमाण वाढलेले पहावयास मिळते.
गटारीच्या शेजारी पडकी इमारत असल्यामुळे दगडे,मातीव कचरा गटारी मध्ये पडून गटारी जाम होत आहेत व शहरात सर्वांत सर्वत्र दुर्गंधी पसरलेली पहावयास मिळते.
नगरपालिका प्रशासनाने वारंवार स्वच्छता करून देखील पडक्या इमारतीमुळे त्याच्यावर पाणी फिरल्यासारखे होत आहे.
प्रत्येक गल्लीमध्ये पडक्या इमारतीतील जागेत आपल्या घरातील कचरा तेथे नागरिक आणून टाकतात त्यामुळे प्रत्येक पडक्या इमारतीमध्ये उकिरडा तयार झालेला आपणास पहावयास मिळतो. याचा नाहक त्रास तेथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
मंगळवेढा नगरपरिषदेने अशा पडक्या इमारतीच्या मालकांना नोटीस काढून पंधरा दिवसात परिसर स्वच्छ करून त्याच्यावर मुरमीकरण करण्यास सांगितले पाहिजे तसे त्यांनी नाही केल्यास नगरपरिषदेने त्या परिसराची स्वच्छता करून त्याचा येणारा खर्च संबंधित मालकाच्या उताऱ्यावरती बोजा चढवावा तरच मंगळवेढा शहरात पडक्या इमारतीमुळे होणाऱ्या समस्या वरती कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे.
यासंदर्भात आज एक दिवस गावासाठी या मोहिमेंतर्गत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रफुल्ल सोमदळे,सतीश दत्तू उपस्थित होते.
