मंगळवेढा:-
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दि १ मार्च रोजी मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या वारी परिवार या सामाजिक संस्थेने सहभाग नोंदवून गणेश बागेत स्वच्छता करून संपूर्ण परिसर चकाचक केला.
यावेळी बागेतील पालापाचोळा गोळा करून कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा नारा देऊन आपल्या कृतीतून प्रबोधन केले आज जरी गाडगे बाबा आपल्यामध्ये नसले तरी वारी पारिवाराच्या स्वच्छता दूतांनी गाडगेबाबांचे विचार जीवंत ठेवलेले आहेत.
सदर परिसराची स्वच्छता-सफाई केल्यामुळे बागेत खेळणाऱ्या लहान मुलांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.
यावेळी सदर अभियानात नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे,पीसआय डॉ.कन्हेरे मॅडम,शिवन्या कलुबर्मे,सिद्धाप्पा शिंदे,मलय्या स्वामी,स्वप्निल टेकाळे,अविराज जाधव,परमेश्वर पाटील,सुमित मुदगुल,दत्तात्रय घाडके,प्रा.विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू आदी उपस्थित होते.
