मंगळवेढा शहर स्वच्छतेसाठी महिलांनी घेतला पुढाकार. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २८ मार्च, २०२६

मंगळवेढा शहर स्वच्छतेसाठी महिलांनी घेतला पुढाकार.


मंगळवेढा:-

महिला जेष्ठ नागरिक संघ मंगळवेढा यांच्या वतीने एक दिवस गावासाठी मोहिमेअंतर्गत संत दामाजी पुतळा परिसराची शनिवारी सकाळी 7 ते 8 या वेळेत स्वच्छता करण्यात आली.


श्री संत दामाजी पुतळा चौकात आहे व वाहतूक जास्त असल्यामुळे धुळीचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ करून पाण्याने पुतळा स्वच्छ करून परिसरात रांगोळी काढण्यात आली.


सदर परीसरात वाढदिवसानिमित्त झाडांच्या कुंड्या भेट देऊन सुशोभीकरण करण्यात येत आहे.मंगळवेढे भूमी संतांची असून शहरातील प्रत्येक संतांच्या मंदिर परिसराची स्वच्छता करणे गरजेचे आहे.


मंगळवेढ्यात दर शनिवार व रविवार राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये वेगवेगळ्या संघटनांनी सहभाग नोंदवावा व स्वच्छ मंगळवेढा सुंदर मंगळवेढा करण्यासाठी प्रयत्न करावा.


यासाठी समस्त मंगळवेढकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील यावेळी महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले.मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


यावेळी अध्यक्षा सुनंदा कलुबर्मे,माजी नगसेविका भागीरथी नागणे,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा इंदुमती जाधव,जिजामाता पतसंस्थेच्या चेअरमन आशा नागणे,माजी चेअरमन जसवंती जमदाडे,संचालिका मालन सोमदळे,सुलक्षणी शिंदे,विजया सावंत,नीला दवले,छाया क्षीरसागर,पद्मावती भुसे,सुजाता माने,जयश्री मेटकरी,सुरेखा ढवळे, मंगल जाधव यांनी सहभाग नोंदवला.

test banner