महात्मा बसवेश्वर स्मारक जनजागृतीसाठी प्रबोधन सप्ताहाचे आयोजन. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

सोमवार, ३० मार्च, २०२६

महात्मा बसवेश्वर स्मारक जनजागृतीसाठी प्रबोधन सप्ताहाचे आयोजन.


मंगळवेढा:-

सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक जगदज्योती महात्मा बसवेश्वरांचे मंगळवेढ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा करण्यासंदर्भात नागरिकांची जनजागृती व्हावी यासाठी प्रबोधन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.


मंगळवेढा येथील कुंभार गल्लीतील रामलिंग मंदिरात झालेल्या समस्त मंगळवेढेकरांच्या विचार विनिमय बैठकीत साप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे.


१२ व्या शतकात मंगळवेढा ही बसवेश्वरांची कर्मभूमी राहिलेली असुन महात्मा बसवेश्वरांच्या समतावादी,क्रांतिकारी विचारांचे आणि सामाजिक परिवर्तनाचे मंगळवेढा मूळ केंद्र होते अशा संत पंरपरेचा वारसा सांगणाऱ्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीत महात्मा बसवेश्वरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभा रहावे यासाठी दिनांक 5 एप्रिल ते 12 एप्रिल 2026 या कालावधीत विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


दि 5 एप्रिल रोजी जन्मभुमी बागेवाडी ते कर्मभूमी मंगळवेढा बसवज्योत सायकल यात्रेतून शुभारंभ होणार असून दि 6 एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर मूर्ती पूजन,

दि 7 एप्रिल रोजी प्रबोधन मशाल रॅली,

दि 8 एप्रिल रोजी सह्यांची मोहीम,

दि 9 एप्रिल रोजी महिलांची प्रबोधन पदयात्रा,दि 10 एप्रिल निबंध स्पर्धा, 

दि 11 एप्रिल मोटरसायकल रॅली,

दि 12 एप्रिल रोजी भव्य महात्मा बसवेश्वर स्मारक संकल्प मेळावा होणार आहे तसेच शहरात व तालुक्यात स्मारक जनजागृतीचे डिजिटल बोर्ड,मोटारसायकल स्टिकर,पत्रके वाटणे अशी तयारी करण्यात आली आहे.


सदर स्मारक मंगळवेढ्यात होणे का आवश्यक आहे,त्यातून शहराचा कसा विकास होणार आहे व पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होणार आहेत याची माहिती शहर व तालुक्यातील सामन्यातील सामान्य लोकांना पटवून देण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी प्रबोधनात्मक सप्ताहाचे नियोजन करण्यात आले आहे.


सदर प्रबोधन सप्ताहामध्ये जास्तीत जास्त मंगळवेढेकरांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

test banner