जागतिक जलदिनानिमित्त गणेश विहिरीची स्वच्छता. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, २२ मार्च, २०२६

जागतिक जलदिनानिमित्त गणेश विहिरीची स्वच्छता.


मंगळवेढा:-

एक दिवस गावासाठी मोहिमेअंतर्गत 20 मार्च जागतिक जलदिनानिमित्त ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या पुरातन श्री गणेश मंदिर परिसर व विहिरीची स्वच्छता करण्यात आली.


गोड्या पाण्याच्या स्रोतांचे महत्त्व अधोरेखित करणे.जल संवर्धनाबाबत जनजागृती करणे आणि शाश्वत व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.


पाणी हेच जीवन समजून त्याचा अपव्यय टाळणे आणि जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज.पाणी जपून वापरणे.


विहीरी व आड स्वच्छ ठेवणे आणि पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर उपाय शोधणे याच उद्देशाने गणेश विहिरीमधे भाविकांनी पुजेचे टाकलेले साहित्य,प्लास्टिक पिशव्या,बाटल्या,नारळ,झाडांचा पाला,विहीरीच्या बांधकामवरती वाढलेली अवांतर झाडे तोडण्यात आली.


सर्व कचरा एका ठिकाणी गोळा करण्यात आला व मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने तो उचलण्यात आला.


मंगळवेढा शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ रहावेत यासाठी प्रशासनाने सर्व विहिरी,आड स्वच्छ करून पाणी वापरात आणावे.


गणेश विहीरीचा उपसा करून स्वच्छ करावी व विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली.


यावेळी माजी सैनिक संघटनेचे मल्लय्या स्वामी,दयानंद गायकवाड,बाबासाहेब माने,चंगेजखान इनामदार,भीमराव इंगळे,संदीप वाघ,दत्तात्रय भोसले,दत्तात्रय घोडके,सागर राऊत,सुजित मुदगुल,सागर देशामाने,स्वप्निल फुगारे,सतीश दत्तू उपस्थित होते

test banner