रमजान ईद निमित्त गैबीसाहेब दर्गा परिसराची स्वच्छता. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १५ मार्च, २०२६

रमजान ईद निमित्त गैबीसाहेब दर्गा परिसराची स्वच्छता.


मंगळवेढा:-

एक दिवस गावासाठी स्वच्छता मोहिमे अंतर्गत रमजान ईदचे औचित्य साधून गैबीसाहेब दर्गा परीसराची संपूर्ण स्वच्छता करून पावित्र्य जपण्यात आले सकाळी 6:30 ते 8:00 या वेळेत ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली.


या मोहिमेत परिसरातील कचरा,पत्रावळ्या,प्लास्टीक पिशव्या,बाटल्या,झाडांचा पाला झाडूने एकत्रित करून मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने तो कचरा उचलण्यात आला.


हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या गैबीसाहेब दर्गा येथे अनेक भाविक दर्शनासाठी व नमाज पडण्यासाठी येत असातात यासाठी परिसराची स्वच्छता करून हीच आपली खरी संस्कृती आहे हे स्वच्छता मोहिमेमधून दाखवून दिले आहे.


यामुळे मंगळवेढयाची स्वच्छ व सुंदर शहर ही ओळख कायम स्वरूपी राहण्यास मदत होणार आहे.


यावेळी नगरसेवक प्रशांत गायकवाड,माजी सैनिक संघटनेचे मल्लय्या स्वामी,चंगेजखान इनामदार,बाबासाहेब माने,दयानंद गायकवाड,सय्यद ईनामदार,महादेव गांडुळे,मुबारक मुलाणी,दत्तात्रय कोरे,फारुख मुजावर,जमीर इनामदार,वसीम मुजावर,अझहर मुजावर,अल्ताफ मुजावर,अश्पाक काझी,अली इनामदार,अमीर मुजावर,संदीप यादव,सुजित मुदगुल,सतीश दत्तू उपस्थित होते.

test banner