सायकलवरती जाऊन मरवडे येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची स्वच्छता. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १५ मार्च, २०२६

सायकलवरती जाऊन मरवडे येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याची स्वच्छता.


मंगळवेढा:-

पर्यावरण रक्षण,आरोग्य संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीने रविवारी सायकलवरती जाऊन मरवडे येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा व परिसराची स्वच्छता करण्यात आली.

 

सद्य स्थितीत छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सुरु असताना सायकलवरती जाऊन शंभू भक्तांनी पुतळ्याची स्वच्छता करून व ध्येयमंत्र घेऊन खऱ्या अर्थाने छत्रपतीनां अभिवादन केले आहे तसेच निसर्गाप्रती आपली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे यासाठी पक्षी वाचवा,निसर्ग वाचवा,सायकल चालवा,इंधन वाचवा हा संदेश देण्यासाठी वारी परिवार सायकल क्लबने स्तुत्य उपक्रम राबविला आहे.


यावेळी पर्यावरण रक्षणानार्थ काढण्यात आलेल्या सदर सायकल राईडमध्ये वारी परिवार सायकल क्लबचे अध्यक्ष स्वप्नील टेकाळे,राहुल सावंजी,सचिन साळुंखे,डॉ.राहुल शेजाळ,नंदकुमार नागणे,विष्णू भोसले,सिद्धेश्वर डोंगरे,प्रफुल्ल सोमदळे,अविनाश जाधव,गणेश मोरे,नागेश डोंगरे,प्रा.विनायक कलुबर्मे आदींनी सहभाग नोंदविला.

test banner