मंगळवेढा:-
संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक दिवस गावासाठी मोहिमेअंतर्गत जवाहरलाल हायस्कूल मंगळवेढा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यामध्ये झाडांचा पडलेला पालापाचोळा,कागदे,प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या रिकाम्या बाटल्या,वाळलेले गवत एकत्रित करण्यात आले व मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने कचरा उचलण्यात आला.
गाडगे महाराज केवळ कीर्तन करत नसत,तर ते आपल्या कीर्तनातून लोकांच्या मनावर 'स्वच्छता' आणि 'मानवता' यांचे विचार बिंबवत.त्यांच्या हातात नेहमी एक 'गाडगे' (मातीचे भांडे) असे, म्हणूनच त्यांना 'गाडगे महाराज' म्हटले जाते.
यावेळी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व स्वच्छ मंगळवेढा सुंदर मंगळवेढा तसेच झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देण्यात आल्या.
सदर मोहिमेमध्ये नगरसेवक प्रवीण खवतोडे,नितीन मेटकरी,सोमनाथ हुशारे,तेजस सूर्यवंशी,माजी सैनिक संघटनेचे मल्लय्या स्वामी,चंगेजखान इनामदार,बाबासाहेब माने,जवाहरलाल हायस्कूलचे नितीन मोरे,मिलिंद कुलकर्णी,शिवकुमार स्वामी,बबन भोसले,प्रवीण चौगुले,खंडू कोकरे,सिद्धेश्वर शिंदे,कुमार गोपाळकर,धनाजी गवळी,लहू ढगे,सुजित मुदगुल,दत्तात्रय घोडके,सुधीर शिर्के,विष्णुपंत भोसले,परमेश्वर पाटील,स्वप्निल टेकाळे,सतीश दत्तू आदींनी सहभाग नोंदवला.
