शिवजयंतीदिनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ड्रायडे जाहीर करावा. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०२६

शिवजयंतीदिनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ड्रायडे जाहीर करावा.


मंगळवेढा:-

संपूर्ण राज्यात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या स्वरूपात साजरा केला जात असतो.


त्यामुळे सदर दिवशी मद्यविक्री बंद रहावी व ड्राय डे घोषित करावा या संदर्भाचे निवेदन सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना मंगळवेढा येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आले आहे.


आज समाजामध्ये व्यसनाचे प्रमाण वाढलेले असुन शिवजयंतीच्यादिनी देखील अशा व्यक्तीपासून मिरवणुकीत व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिलांना व समाजातील अनेक घटकांना मोठा त्रास होऊन,शांतता व सुव्यवस्था बिघडली जाते.


यासाठी दि १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी महाराष्ट्रात हा दिवस कायमस्वरूपी ड्राय डे म्हणून जाहीर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांत गायकवाड,चंद्रकांत काकडे,नगरसेवक अनिल बोदाडे,प्रमोद सावंजी,चंद्रकांत चेळेकर,सतीश दत्तू उपस्थित होते.

test banner