मंगळवेढा:-
संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त एक दिवस गावासाठी मोहिमेअंतर्गत मंगळवेढा शहर बोराळे नाका परिसरातील मारुती मंदिर व मरीआई मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
रविवारी सकाळी 7 ते 8 या वेळेत मंदिर परिसर झाडूने स्वच्छ करण्यात आला व पालापाचोळा,नारळाची केसरे एकत्रित करून त्याची विल्हेवाट लावली तसेच संपूर्ण परिसर पाण्याने स्वच्छ केला.
मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने सदर ठिकाणी एकत्रित केलेला कचरा तात्काळ उचलण्यात आला तसेच मारुती मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपणासाठी सागर शिंदे व संगम शिंदे यांचे सहकार्य लाभले.
सदर मोहिमेमध्ये शिवाजी वाकडे,अविनाश शिंदे,सिद्धेश्वर आवताडे,सोमेश्वर यावलकर,दत्तात्रय भुसे,जनार्धन कोंडुभैरी,नजीर इनामदार,बबलू सुतार,सुजित मुदगुल,परमेश्वर पाटील,चंद्रकांत काकडे,पांडुरंग कोंडूभैरी,समाधान शिंदे,संजय बामणे,विशाल सरकळे,सुरज सावंत,सचिन घुले,गणेश दत्तू,अंकुश सावंत,चंद्रकांत चेळेकर,विजय निकम,राजवर्धन शिंदे,सुदर्शन शिंदे,यल्लाप्पा गुंगे,अंबादास गुंगे,सतीश दत्तू यांनी सहभाग नोंदवला.
