मंगळवेढा (प्रतिनिधी):-
परिसरातील गहू व मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरलेली भव्य शिवार फेरी व चर्चासत्राचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
सिडॉन ॲग्री इंटरनॅशनल यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात कृषिमित्र अजय आदाटे यांच्यासोबत पंचक्रोशीतील सर्व शेतकरी व सिडॉन ॲग्री इंटरनॅशनल ची सर्व टीम, कृषी निविष्ठा दुकानदार बंधू सर्वांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
शिवार फेरीदरम्यान गहू व मका पिकांची वाढ, पेरणी व्यवस्थापन, खतांचे संतुलित प्रमाण,सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, कीड-रोग नियंत्रण तसेच पाणी व्यवस्थापन या विषयांवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. “उत्पादन वाढीसाठी योग्य वेळी योग्य उपाययोजना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक आहे,” असे मत अजय आदाटे यांनी व्यक्त केले.
बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून खर्च कमी व उत्पन्न वाढविणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कंपनी चे झोनल अधिकारी श्री.ओंकार फडतरे व विभागीय व्यवस्थापक पूनम शिंदे यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कंपनी प्रतिनिधी अमित कुंभार यांनी केले.
चर्चासत्रात शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. माती परीक्षणाचे महत्त्व, सुधारित बियाण्यांची निवड, वाढीच्या टप्प्यानुसार खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रणासाठी योग्य औषधांचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष शिवारात उभे राहून दिलेल्या माहितीमुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन अधिक प्रभावी ठरले.
या कार्यक्रमास सिडॉन कंपनीचे प्रतिनिधी ओंकार फडतरे (झोनल हेड), पूनम शिंदे (विभागीय हेड), अमित कुंभार (सेल्स हेड, मंगळवेढा) तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक ठेवले होते ते श्री.सिद्देश्वर भगत (प्रो. प्रा. ॲग्रोहब कृषी केंद्र) व कंपनी प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितांमध्ये विजय सपताळे (श्रीराम कृषी), अजय आवताडे (आवताडे ॲग्रो), रफिक शेख (शेतकरी कृषी केंद्र), जाधव साहेब (राजलक्ष्मी ॲग्रो), माजी सदस्य दत्तात्रय कांबळे यांच्यासह परिसरातील गहू-मका उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान कंपनीच्या विविध कृषी उत्पादनांची माहिती देण्यात आली. तंत्रज्ञानाधारित शेती, नियोजनबद्ध खत व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास यावर भर देत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याचे आवाहन करण्यात आले.
उत्स्फूर्त सहभाग,थेट संवाद आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून, अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांमुळे परिसरातील शेती अधिक सक्षम आणि नफ्याची होण्यास चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
