बारामती येथे सायकलवरती जाऊन स्व.अजित दादांना मंगळवेढेकरांच्या वतीने वाहिली आदरांजली. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

बारामती येथे सायकलवरती जाऊन स्व.अजित दादांना मंगळवेढेकरांच्या वतीने वाहिली आदरांजली.


मंगळवेढा:-

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व अजितदादा पवार यांचे विमान अपघातामध्ये दुःखद निधन झाल्यानंतर जिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर जाऊन प्रा.विनायक कलुबर्मे व प्रफुल्ल सोमदळे यांनी दोन दिवसात मंगळवेढा-बारामती जाता येता २८० किलोमीटर सायकल प्रवास करून मंगळवेढेकरांच्या वतीने अभिवादन करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.


स्व.दादांचे मंगळवेढ्यातील जनतेशी भावनिक नाते होते त्यांचे मंगळवेढ्यावरती विशेष लक्ष होते शहराच्या विकासासाठी दादांनी अनेक योजनेंसाठी लागणारा निधी,महापुरुषांच्या पुतळ्यासाठी लागणाऱ्या मान्यता यासाठी सर्वतोपरी मदत करून कायमच झुकते माप दिले आहे अशा नेत्याला तमाम मंगळवेढेकरांच्या वतीने बारामतीत जाऊन आदरांजली वाहावी यासाठी सोमदळे व कलुबर्मे यांनी आपल्या कृतीतून स्व.अजित दादांना श्रद्धांजली वाहिली आहे.


 स्व.अजित दादा पवार हे पर्यावरण प्रेमी होते अशा पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या या लाडक्या नेत्याला त्यांच्याच विचारातून पर्यावरण पूरक असलेल्या सायकलीचा उपयोग करून बारामती येथे जाऊन आदरांजली वाहून खरी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या विचारासा वारसा जपला आहे.


सुरवातीस पवार कुटुंबाचे मूळ गाव असलेल्या काटेवाडी येथे जाऊन स्व.अजित दादांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन स्व.अजित दादांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार व सौ. शर्मिला श्रीनिवास पवार यांची भेट घेऊन स्व.दादा व मंगळवेढा यांचे कसे घट्ट नाते होते याची माहिती देण्यात आली.


तसेच स्व.अजित दादांच्या बारामती येथील सहयोग भवन येथे जाऊन प्रतिमेस पुष्पाजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अमर रहे अमर रहे अजित पवार अमर रहे,परत या परत या अजित दादा परत या असे पुकारा करीत स्मरण करण्यात आले.


यावेळी पवार कुटूंबाच्या वतीने एवढ्या लांबून सायकलवरती येऊन प्रा.कलुबर्मे व सोमदळे यांनी दादांबद्दल प्रेम दाखविल्याबद्दल दोघांची विशेष विचारपूस करण्यात आली.


यावेळी विद्या प्रतिष्ठानचे डॉ.राज कदम,प्रा.हणमंत पाटील,बालाजी दत्तू उपस्थित होते.

test banner