मंगळवेढा येथे ग्रंथदिंडीतुन दिला वैचारिक शिवजयंतीचा संदेश. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

मंगळवेढा येथे ग्रंथदिंडीतुन दिला वैचारिक शिवजयंतीचा संदेश.


मंगळवेढा:-

शिवजयंती नाचून नाही तर वाचुन साजरी व्हावी या विचारातुन राहुल ताड यांच्या मार्गदर्शनाखाली व रवि मोरे यांच्या संकल्पनेतून मंगळवेढा येथील नगरपालिका शाळा नंबर दोन या शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ग्रंथदिंडी काढण्यात आली. 


या ग्रंथदिंडी मध्ये शिवाजी महाराजांच्या पत्रातुन कळणारे छत्रपती शिवाजी महाराज,तुकोबा ते शिवराय, दगलबाज शिवाजी,राजमाता जिजाऊ,शिवराज्याभिषेक,शिवराय शिक्षण आणि संस्कार,या पुस्तकांचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. 


या ग्रंथदिंडी मध्ये नगरपालिका शाळा नंबर दोन मधील शिक्षक मुख्याध्यापक मांजरे गुरूजी,जाधव गुरूजी,राऊत गुरूजी,काझी मॅडम,ढगे गुरुजी,लाळे गुरूजी उपस्थित होते.


नगरपालिका शाळा नंबर दोन इथुन ग्रंथदिंडी जुनी बॅंक ऑफ इंडिया मुरलीधर चौक,चोखामेळा चौक अशी काढण्यात आली.या फेरी मध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा,शिवचरित्र वाचुन आत्मसात करा,झाडे लावा झाडे जगवा,शिवजयंती घरोघरी साजरी करा अशा घोषणा दिल्या.


सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मंगळवेढा येथील शिवमुर्तीचे पुजन रोहित ताड व दिगंबर भगरे यांच्या हस्ते करण्यात आले.शिवमुर्ती समोर विद्यार्थ्यांनी शिवचरित्राचे वाचन केले व वाचन संस्कृती जोपासण्यासाठी नवा पांयडा पडला. 


या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी रोहित ताड,दिगंबर भगरे,सचिन इंगळे,रवि मोरे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष हर्षद डोरले,संभाजी घुले,वारी परिवाराचे अध्यक्ष सतिश दत्तु,नगरसेवक राहुल सांवजी,इंद्रजीत चव्हाण,प्रशांत शिंदे,अर्जुन डोरले,शक्ती ताड उपस्थित होते. 


यावेळी आदर्श प्राथमिक विद्यालय शिशु विहार पंढरपूर येथील विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होता त्यांनाही पुस्तके देण्यात आली.


हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी खिलाडी ग्रुप मंगळवेढा, श्री शंभू राज्याभिषेक सोहळा समिती किल्ले रायगड मंगळवेढा विभाग यांनी परिश्रम घेतले.

test banner