शिवतीर्थावरील टाऊन हॉलला छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन नाव देण्याची मागणी. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

शिवतीर्थावरील टाऊन हॉलला छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन नाव देण्याची मागणी.


मंगळवेढा:-

मंगळवेढा येथील शिवप्रेमी चौकातील शिवतीर्थावर नगरपरिषदेच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या टाऊन हॉलला छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असे नाव देण्यात यावे अशी मागणी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.


मंगळवेढा शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला असुन अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत २० डिसेंबर १६६५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज दोन दिवस मुक्कामी होते सद्यस्थितीत शिवप्रेमी चौककामध्ये भव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला असुन मंगळवेढा शहराच्या सौंदर्यात भर पडलेली आहे.


सदर जागा शिवतीर्थ म्हणून ओळखली जात आहे अशा पवित्र जागेवर मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने टाऊन हॉल उभारणी झाली असुन सदर टाऊन हॉल छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन असे नाव देण्यात यावे अशी समस्त मंगळवेढेकरांची देखील मागणी आहे असे निवेदन नगराध्यक्षा आवताडे यांच्याकडे देण्यात आले आहे.


यावेळी नगरसेविका सीमाताई बुरजे यांचेसह सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष,पदाधिकारी,शिवभक्त उपस्थित होते.


test banner