महाशिवरात्रीनिमित्त श्री शंकरलिंग मंदिर परिसराची स्वच्छता. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

महाशिवरात्रीनिमित्त श्री शंकरलिंग मंदिर परिसराची स्वच्छता.


मंगळवेढा:-
एक दिवस गावासाठी या मोहिमेअंतर्गत महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री शंकरलिंग मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.

मंगळवेढा शहरातील जागृक नागरिक एकत्रित येऊन हा उपक्रम राबवत आहेत.यामध्ये मंदिर परिसरातील पालापाचोळा,नारळाची केसरे,दारुच्या बाटल्या,प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या रिकाम्या बाटल्या,वाळलेले गवत एकत्रित करण्यात आले व मंगळवेढा नगरपरिषदेच्या वतीने कचरा उचलण्यात आला.

तसेच मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ करण्यात आला.
दर रविवारी होणाऱ्या स्वच्छते मोहिमेमध्ये मंगळवेढा शहरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आव्हान देखील यावेळेस करण्यात आले.

मंगळवेढा शहरातील प्रत्येक धार्मिक स्थळावरती स्वच्छता व नित्य पूजा त्या संबंधित संस्थेने नित्य रूपाने करावी अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

सदर मोहिमेमध्ये माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मेजर मल्लय्या स्वामी,मेजर प्रकाश लिगाडे,मेजर दयानंद गायकवाड,दत्तात्रय भोसले,दत्तात्रय कोरे,परमेश्वर पाटील,सुनिल मुढे,विलास कांबळे,चंद्रकांत चेळेकर,सुजित मुदगुल,दत्तात्रय घोडके,स्वप्नील टेकाळे,सतीश दत्तू यांनी सहभाग नोंदवला.
test banner