सामाजिक कार्याबद्दल सतिश दत्तू यांना जनसेवा पुरस्कार जाहीर. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

सामाजिक कार्याबद्दल सतिश दत्तू यांना जनसेवा पुरस्कार जाहीर.


मंगळवेढा:-

दैनिक दामाजी एक्सप्रेसचा जनसेवारत्न पुरस्कार वारी परिवाराचे अध्यक्ष सतिश दऱ्याप्पा दत्तू यांना जाहीर.


अनेक तरुणांना एकत्र करून प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूर जाणाऱ्या वारी परिवाराचे सामाजिक कार्य सुरु आहे ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो आहे त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो तसेच आपण आपल्या गावासाठी काही तरी करावे या भावनेतून दारू नको दूध प्या,वृक्षरोपण,माणुसकीची भिंत,मतदान जनजागृती सायकल रॅली,मारणोत्तर नेत्रदान,व्यसमुक्ती,सार्वजनिक शौचालायाची स्वच्छता,शैक्षणिक साहित्य वाटप,बेघर झालेल्या अनाथांना ब्लॅकेट वाटप,स्मशानभूमीतील महिलेचा सन्मान करून महिला दिन अशा अनेक क्षेत्रामध्ये वारी परिवाराने सामाजिक कार्याचा ठसा उमटवीला आहे.


तसेच त्यांनी सुरू केलेल्या एक दिवस गावासाठी उपक्रमांतर्गत विविध मंदिरांची स्वच्छता व मंगळवेढा शहरातील विविध प्रश्नसंदर्भात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे याचीच दखल घेऊन दैनिक दामाजी एक्सप्रेसने त्यांना जनसेवारत्न पुरस्कार जाहीर केलेला आहे याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

test banner