मंगळवेढा:-
श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भालेवाडी गावात मतदार जनजागृती फेरी काढून प्रबोधन करण्यात आले.
विशेष श्रमसंस्कार शिबिरात यावेळी संपूर्ण गावातून फेरी काढून मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो,आपले मत पवित्र मत,चला रे चला मतदानाला चला असा जागर घालण्यात आला.
यावेळी संविधानाने दिलेला हक्क आपण चांगल्या पद्धतीने बजावला पाहिजे कोणत्याही अमिषाला बळी न पडता मतदान करा या अशयाचे फलक विशेष आकर्षित करीत होते.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विदयार्थ्यांनी घरोघरी जाऊन लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येक नागरिकांनी सहभाग नोंदवून लोकशाही बळकट करावी असे आवाहन देखील करण्यात आले.
यावेळी चला रे चला मतदानाला चला,मतदान करूया लोकशाही बळकट करूया,लावा बोटाला शाई बळकट करा लोकशाही,अंगणात घाला रांगोळी सडा मतदानाला बाहेर पडा,अशा घोषणा देऊन परिसर दानाणून सोडला.
यावेळी प्राचार्य डॉ.औदुंबर जाधव उपप्राचार्य प्रा.राजेंद्र गायकवाड,सरपंच डॉ.श्रीकांत दवले,प्रकल्प अधिकारी डॉ.राजाराम पवार,डॉ.सुधाकर राठोड,डॉ.जावेद तांबोळी,संगाप्पा पाटील यांचेसह सर्व ग्रामस्थ,प्राध्यापक,प्राध्यापिका,स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
