मंगळवेढा:-
सिद्धापूर फेस्टिवलच्या वतीने देण्यात आलेला आदर्शसामाजिक संस्था पुरस्कार मंगळवेढा येथील वारी परिवार या सामाजिक संस्थेस प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्काराचे सन्मानचिन्ह आमदार समाधान दादा आवताडे यांच्या हस्ते उद्योजक वैभव नागणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
यावेळी आमदार आवताडे यांनी वारकरी संप्रदायातील भक्तीभाव,समाजप्रबोधन आणि परंपरेची जपणूक करून सामाजिक निष्ठा ठेवत अविरतपणे कार्य करणाऱ्या वारी परिवाराच्या कार्याचा गौरव करीत अभिनंदन केले.
मंगळवेढा-पंढरपूर हरित पालखी महामार्गावरील वृक्षलागवड व संवर्धन,बेघर झालेल्या महिलेस हक्काचा आश्रय,ज्वारी -मका परिषद,कृषी जागर दिंडी, गुटखा-तंबाखू पुड्यांची केलेली होळी,पक्षांना चारा व पाणी यांची केलेली व्यवस्था,जल जागर दिंडी,दारू नको दूध प्या अशा अनेक समाजपयोगी व पर्यावरण पुरक योगदानाबद्दल वारी परिवारास सदर पुरस्काराने गौरविण्यात आले.
या अगोदरही सामाजिक कार्याबद्दल वारी परिवारास अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी पुरस्कार स्विकारताना वारी परिवाराचे कृषीतज्ञ अजय आदाटे,चंद्रकांत चेळेकर,प्रफुल्ल सोमदळे,स्वप्निल टेकाळे,बाळासाहेब यादव,प्रा.विनायक कलुबर्मे आदीजण उपस्थित होते.
मिळालेल्या पुरस्काराबद्दल वारी परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.यावेळी सिद्धापूर-तांडूर गावातील सर्व पदाधिकारी,परिसरातील स्सर्व ग्रामस्थ,विद्यार्थी,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले.
