मंगळवेढा:-
सिद्धापूर फेस्टिवलच्या वतीने आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार वारी परिवार मंगळवेढा या सामाजिक संस्थेस जाहीर करण्यात आलेला आहे.
वारी परिवाराच्या वतीने अनेक लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.दारू नको दूध प्या,माणूसकीची भिंत,नेत्रदान महासंकल्प,नोकरी महोत्सव,विद्यार्थी दत्तक योजना,शैक्षणिक साहित्य वाटप,पर्यावरण रक्षण जनजागृती प्रबोधन सायकल रॅली,वृक्षलागवड व संवर्धन मोहिम,व्यसनमुक्ती अभियान,वीर जवान तुझे सलाम,सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा,ज्वारी मका परिषद,डांळीब उत्पादक शेतकरी कार्यशाळा,खूला गट खो खो स्पर्धा,एडस् जनजागृती सप्ताह,स्वच्छता मोहिमा,स्मशानभूमी गाय दान अशासामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,कृषी,क्रिडा,क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
सदर पुरस्काराचे वितरण दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता सिद्धापूर येथे होणार आहे.
