सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीसपदी पदी संभाजी तानगावडे यांची निवड झाल्याबद्दल मंगळवेढ्यात सत्कार संपन्न - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या सरचिटणीसपदी पदी संभाजी तानगावडे यांची निवड झाल्याबद्दल मंगळवेढ्यात सत्कार संपन्न

 प्रतीनिधी :  




नुकत्याच इंदापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सिनियर कौन्सिल सभेत सोलापूर जिल्ह्यातील विविध  पदाधिकारी निवडी संपन्न झाल्या. 

    राज्याचे नेते संभाजीराव थोरात तात्या , धडाडीचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे आणि नगरपालिका व महानगरपालिका राज्य सरचिटणीस संजय चेळेकर व राष्ट्रीय संघाचे सन्माननीय पदाधिकारी यांचे उपस्थितीत सदर निवडी झाल्या .



        संभाजी तानगावडे यांनी मंगळवेढा तालुका अध्यक्ष म्हणून गेली सात वर्षे अत्यंत उठावदार काम केलेले आहे त्यांची कारकीर्द केंद्र संघटक ते जिल्हा सरचिटणीस पदाचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय कामगिरीने व्यापलेला आहे . त्यांचा सन्मान करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या सभागृहात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 

            सदर कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक शिक्षक बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना नपा व मनपा राज्य सरचिटणीस संजय चेळेकर यांच्या हस्ते संभाजी तानगावडे यांचा सत्कार संप्पन्न झाला. यावेळी अनेक शिक्षक बांधवांनी मनोगते व्यक्त केली संजय चेळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संभाजी तानगावडे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालून, अभ्यास करून सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करतात. शिक्षकांचे विविध प्रश्न, फंड प्रकरणे, मेडिकल बीले, बदली प्रक्रिया मार्गदर्शन, महिला व आजारी शिक्षकांचे निवडणुक आदेश रद्द करणे अशी अनेक कामे सातत्याने केलेली आहेत. याशिवाय मेडिकल प्रवेश, इंजिनिअरींग प्रवेश तसेच सर्व इतर ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयातील शिक्षकांची कामे अगदी तत्परतेने करतात. त्यांची झालेली निवड ते निश्चितच आपल्या कार्याचा ठसा उमटवून सार्थ ठरवतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष भारत शिंदे, श्री संत दामाजी शिक्षक सोसायटीचे चेअरमन भिमाशंकर तोडकरी, माजी चेअरमन शिवाजी गणपाटील, माजी व्हाईस चेअरमन धनाजी नागणे, कार्यकारी अध्यक्ष कविराज दत्तू, कार्याध्यक्ष नागेश धनवे, सरचिटणीस राजेंद्र केदार , प्रवक्ते सिध्देश्वर मेटकरी, आनंद भोपळे, आनंदराव जगताप, गोपाळ लेंडवे , दादा इंगोले, औदुंबर कुंभार, दत्तात्रय जाधव, दत्तात्रय वाघ यांची सत्कार प्रसंगी मनोगते झाली. 

          यावेळी सत्काराला उत्तर देताना संभाजी तानगावडे यांनी सर्वांचे आभार मानले व आपण शिक्षक संघाच्या मागे ठामपणे उभे रहावे असे आवाहन करून जिल्हा भरातील सर्व गुरूजनांची सेवा करण्याचे अभिवचन दिले.

test banner