मंगळवेढा:-
सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे स्वागत करताना मंगळवेढ्यातील दामाजी चौकात दारू नको दुध प्या या उपक्रमातून 31 डिसेंबरच्या रात्री वारी परिवाराच्या वतीने व्यसनमुक्तीचा नारा देण्यात आला.
यावेळी प्रथम विठ्ठल मूर्तीचे पूजन पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगीड्डे,लक्ष्मणराव ढोबळे,बबनरावजी आवताडे,येताळा भगत,शशिकांत चव्हाण,प्रशांत गायकवाड,बाबा कौंडुभैरी,सोमनाथ हुशारे,सीमा बुरजे,क्रांती दत्तु,अरुण किल्लेदार,सिद्धेश्वर आवताडे,तेजस सुर्यवंशी,मारुती वाकडे,रमेश जोशी,मलाय्या स्वामी,राजेंद्र चेळेकर,प्रमोद सावंजी,सिध्देश्वर मेटकरी,प्रविण गोवे,अनिल बोदाडे, सोमनाथ माळी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोरीगिड्डे म्हणाले दारू पिणे मानवी आरोग्यास खूपच धोकादायक आहे.आज पोलीस स्टेशनमध्ये दहा गुन्हयापैकी आठ गुन्हे हे दारूमुळे घडत आहेत ही फारच विचार करण्याची गोष्ट आहे आज घरामधील एक कर्ता पुरूष दारूमुळे मरण पावला तर ते कुंटूब रस्त्यावर येते मग त्या स्त्रीने करायचे काय यासाठी दारूमुक्तीसाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे.
प्रत्येकाने एका व्यक्तीला दारूपासून परावृत्त केले तर खऱ्या अर्थाने सदर उपक्रमाचे फलित होईल वारी परिवाराने व्यसनमुक्त मंगळवेढा हा जो संकल्प केलेला आहे त्यासाठी वारी परिवाराच्या पाठीशी सदैव पोलीस उभे राहतील असे सांगून नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.
व्यसनमुक्त तरूणच खरी देशाची संपत्ती आहे हे ओळखूनच वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने 31 डिसेंबरच्या रात्री दामाजी चौकामध्ये दारू नको दूध प्या या उपक्रमातून 2500 लोकांना मोफत मसाला दुधाचे वाटप करून व्यसनमुक्तीचाच नारा दिला आहे.
31 डिसेंबर म्हटले की,तरुण युवा वर्ग दारू पिऊन जुन्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असतात त्या अनुशंगाने मोठया प्रमाणावर हुल्लडबाजी,दारू पिऊन वाहन चालविणे,सांयलेन्सरच्या पुंगळ्या काढून मोठा आवाज करणे त्यामुळे शांतता व सुव्यवस्था भंग पावते तसेच दारूमुळे अपघात होतात,काही लोक मृत्युमूखी पडतात तर काहीजण जखमी होतात परिणामी त्यांच्या कुंटुबाचा आधार गेल्याने संपूर्ण कुंटुब रस्त्यावर येते अशा घटना घडू नयेत यासाठी वारी परिवाराने दारूमुक्तीसाठी उचललेले पाऊल खूप महत्वाचे आहे.
या उपक्रमास मंगळवेढा पोलीस स्टेशन मंगळवेढा,शिवश्री प्रतिष्ठान मंगळवेढा,उमेश भीमदे,संतोष बुरकूल यांचे विशेष सहकार्य लाभले वारी परिवाराचे सर्व सदस्य व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी केले तर प्रा.विनायक कलुबर्मे यांनी आभार मानले.
