प्रतीनिधी:
जिजाऊ ब्रिगेड मंगळवेढा यांच्या वतीने नारीशक्तीचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. यामध्ये मंगळवेढा येथे होणाऱ्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सावित्रा वागज,वंदना घोडके,माधुरी सावंजी,रुक्मिणी भगत,चिंगूबाई नवत्रे,अरुणा शिंदे,सुजाता कसगावडे,रंभा गायगोपाळ,अश्विनी सोळगे या महिलांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन शिवमती प्रियदर्शनी कदम-महाडिक व शिवमती पूजा गायकवाड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रियदर्शनी कदम म्हणाल्या "महिलांचे योगदान समाजाच्या प्रगतीसाठी अमूल्य आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सन्मान मिळाला पाहिजे. या कार्यक्रमाद्वारे समाजातील महिलांना प्रेरणा मिळेल" कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दया वाकडे व आभार निकीता जाधव यांनी मानले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा शिवमती इंदुमती जाधव व शहराध्यक्षा शिवमती सुवर्णा मुळीक यांचेसह बहुसंख्याने महिला उपस्थित होत्या