मंगळवेढा:-
जिजाऊ ब्रिगेड मंगळवेढा यांच्या वतीने नारीशक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे.विविध क्षेत्रांमध्ये आदर्श काम करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास अध्यक्षा शिवमती प्रियदर्शनी कदम-महाडिक व प्रमुख पाहुणे म्हणून शिवमती पूजा गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम ५ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता नगरपरिषद सभागृह मंगळवेढा या ठिकाणी होणार आहे.
तरी महिलांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा शिवमती इंदुमती जाधव व शहराध्यक्षा शिवमती सुवर्णा मुळीक यांनी केले आहे.