वारी परिवाराने दिला पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

वारी परिवाराने दिला पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात.


मंगळवेढा:-

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सीनानदी काठावरील असलेल्या गावांना महापूराचा फटका बसल्याने शेकडो कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले असुन घर,संसारासह शालेय विद्यार्थ्यांचे वह्या,पुस्तके,गणवेश,दप्तर यांसारखे शैक्षणिक साहित्य वाहून गेले असता लोकसहभागातून मंगळवेढ्यातील वारी परिवाराने मात्र अशा कठीण प्रसंगी पूरामुळे कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,साहित्य नष्ट झाल्यामुळे शाळा सोडण्याची वेळ येऊ नये व त्याचा मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी एक हात मदतीचा या अभियानातून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटून आधार दिला आहे.


मुसळधार पाऊस आणि महापुराने बाधित झालेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी वारी परिवाराने मंगळवेढ्यातील नागरिकांना शैक्षणिक साहित्य मदतीचे आवाहन केले असता नागरिकांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत शैक्षणिक साहित्य जमा केले होते.


सदरचे सर्व शैक्षणिक साहित्य वारी परिवाराच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील एकुरके,बोपले,पासलेवाडी,भोयरे,मालिकपेठ या गावातील एकूण ८ जिल्हा परिषद व अंगणवाडी शाळेत शिकणाऱ्या ६५० विदयार्थ्यांना साहित्य वितरित करून खरोखरचं खूप मोलाचे कार्य केले आहे.


यावेळी समाजातील संकटात सापडलेल्या मुलामुलींना मदतीचा हात देऊन वारी परिवाराने मात्र खरी मानवसेवा केली आहे असे मत महेश पवार यांनी व्यक्त करत परिवाराच्या कामाचे कौतुक केले तर सर्वच गावातील ग्रामस्थांनी वारी परिवाराने विद्यार्थ्यांना दिलेला आधार कायम आठवणीत राहील असे सांगून आभार मानले.


यावेळी शालेय साहित्य मिळताच पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला यावेळी सदर शैक्षणिक किट वाटताना वारी परिवाराचे स्वप्निल टेकाळे,राजाभाऊ गणेशकर,अरुण गुंगे,दत्तात्रय भोसले,अविराज जाधव,अक्षय हेंबाडे,प्रफुल्ल सोमदळे,योगेश दत्तू,चंद्रकांत चेळेकर,दिलीप आडसूळ,आकाश साबळे,दत्तात्रय भुसे,प्रा विनायक कलुबर्मे,सतिश दत्तू यांचेसह सर्वच गावातील ग्रामस्थ,शिक्षक,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सदर अभियनासाठी मंगळवेढ्यातील नागरीक,महेश पवार,दत्तात्रय मिसाळ,विष्णू शेटे,जगन्नाथ कोल्याळ,नानासाहेब ढवन,दादासाहेब साठे,भाऊसाहेब कोल्याळ,बालाजी साठे,प्रदीप साठे,विजय कारांडे,रणजित देशमुख,बाळासाहेब पाटील नरखेडकर,नागेश साठे,गणेश जगताप यांचेसह सर्व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

test banner