मंगळवेढा:-
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने आलेल्या महापूरामुळे सीनानदीकाठावरील नागरिकांच्या घराचे, शेतीचे,जनावरांचे खूप मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांचे तर सर्व दप्तर,शैक्षणिक साहित्य वाहून गेले असल्यामुळे त्यांच्यासाठी आपलाही कुठेतरी मदतीचा हात पुढे आला पाहिजे याकरिता मंगळवेढा येथील वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीने एक हात मदतीचा ही मोहीम राबविली जात आहे.
अस्मानी संकटात सापडलेल्या कुटूंबाना आधार देण्यासाठी व महापुरात सर्व काही गमावलेल्या मुलां-मुलींच्या भविष्यकालीन शिक्षणासाठी सॅक,पॅड,कंपासपेटी,वह्या,पेन,पेन्सिल,पट्टी व इतर शैक्षणिक साहित्य दिनांक २ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत अविदा इलेक्ट्रिकल्स,शिवालय शेजारी,शिवप्रेमी चौक,मंगळवेढा येथे जमा करावे व अधिक माहितीसाठी ७२७६८६०८४२ /९४०३४५१२९७ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन वारी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.