मंगळवेढा:-
सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने एचआयव्हीग्रस्त मुला मुलींचे संगोपन करणाऱ्या पंढरपूर येथील प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी या बालकांच्या संगोपन प्रकल्पास विविध प्रकारचे खाद्य पदार्थ व फळे वाटप करण्यात आले.
यावर्षी मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमातून आगळा वेगळा नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
यावेळी प्रकल्पातील मुलींनी मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांना राखी बांधून औक्षण केले यावेळी संचालिका डिंपलताई शहा-घाडगे म्हणाल्या की नवरात्र महोत्सव सुद्धा अशा मुलांच्या जवळ येऊन साजरा करता येतो हा विचार मंडळाने रुजवीला असुन असे उपक्रम झाले तरच पीडितांचे दुःख कळेल असे सांगून मंडळाचे कौतुक करून त्यांनी आभार मानले.
पालवी एक घर आहे एचआयव्ही पॉझिटिव्ह बालकांचे कोणीतरी केलेल्या चुकांचे परिणाम ही निरागस बालके भोगत आहेत अशा बालकांचे चेहरे प्रफुल्लित करण्यासाठी समाजाचे हात पुढे आले पाहिजेत हा आदर्श सप्तशृंगी नवरात्र मंडळाने उभा केला आहे.
यावेळी संचालिका मंगलताई शहा,डिंपल ताई शहा-घाडगे,मंडळाचे अध्यक्ष अजित गोवे,माजी अध्यक्ष दत्तात्रय जावळे,शिवाजी नागणे,शरद हेंबाडे,दिलीप वाडेकर,शामराव जठार,अविनाश चेळेकर,गजानन शिंदे,विनोद सावंत,विजयराज कलुबर्मे,समाधान डोंगरे,संजय जावळे,संतोष डोंगरे,सोहम घोडके,अक्षय वांगेकर,सुधीर सावंजी,डॉ.युवराज पवार अमित सावंत,संभाजी नागणे,ऋतुराज भगत,रोहित जठार,सिद्धेश्वर डोंगरे,ओम खटकाळे,सोमा सपाटे,विवेक भोसले,शुभम कांबळे,शरद रुपनर,प्रा. विनायक कलुबर्मे यांचेसह सर्व बालके उपस्थित होते.