काँग्रेसच्या वतीने मंगळवेढा नगरपालिकेच्या समोरच बोंब मारो आंदोलन करण्यात आले. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५

काँग्रेसच्या वतीने मंगळवेढा नगरपालिकेच्या समोरच बोंब मारो आंदोलन करण्यात आले.


मंगळवेढा:-

मंगळवेढा शहरांमध्ये ठीक ठिकाणी गटारीचे पाणी साठून तळ्याचे स्वरूप आले आहे.अनेकांच्या घरांमध्ये किचन पर्यंत गटारीचे पाणी गेले आहे.

आपत्कालीन परिस्थिती असताना नगरपालिका प्रशासन कोणतीही दखल घेताना दिसत नसल्यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या समोरच नगरपालिका प्रशासनाचे पिंडदान करून प्रशासनाचा व प्रशासनाच्या जीवावर गेली चार वर्षे नगरपालिकेचा कारभार सोपवणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवत मंगळवेढा काँग्रेस कमिटीच्या वतीने बोंबाबोंब करत अधिकाऱ्यांना जणाची  नाही तर मनाची लाज वाटावी  म्हणून मुख्याधिकाऱ्याच्या खुर्चीला, प्रशासकीय अधिकारी तसेच बांधकाम अभियंता यांच्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालण्यात आले. 

या वेळी बोलताना काँग्रेस शहराध्यक्ष ॲड.राहुल घुले म्हणाले की  लवकरात लवकर शहरातील गटरीच्या पाण्याचे नियोजन करा लोकांच्या घरात गटरीचे पाणी शिरल्यास नगरपालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना गटरीच्या पाण्यात बुडवले जाईल असा इशारा दिला. 

यावेळी गणेश धोत्रे,मुजम्मील काझी,माऊली कोंडुभैरी,संदीप फडतरे,अजय गाडे, विजय हजारे, मनोज माळी,बापू अवघडे,अर्जुन देवकर,प्रदीप घुले, फारूक मुजावर, किरण घोडके,अमोल घुले,विक्रम शेंबडे, अरबाज तांबोळी,सचिन साळुंखे उपस्थित होते.

test banner