मंगळवेढा:-
सप्तशृंगी नवरात्र मंडळाने देवीच्या उत्सवात धुणी भांडी करणाऱ्या महिलांचा केलेला सन्मान हे खरोखरचं आदर्शवत काम आहे असे मत पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले ते सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या धुणी-भांडी-घरकाम करणाऱ्या महिलांना साडी व त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप सामाजिक उपक्रमाप्रसंगी बोलत होते.
सुरवातीस मंडळाच्या वतीने बोरीगिड्डे यांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोरीगिड्डे म्हणाले महिलांच्या अडचणी जाणून घेऊन काही सकारात्मक मार्ग काढता येईल का? या विचाराने सप्तशृंगी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रमाअंतर्गत संत चोखामेळा नगर व संत दामाजी नगर मध्ये धुणी-भांडी-घरकाम करणाऱ्या ५५ महिलांना साडी व त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आधार दिला आहे.
डिजे,डॉल्बी लावून लोंकाना त्रास देण्यापेक्षा अशा उपक्रमातून समाजातील लोंकाना मायेने आणि आपुलकीने जवळ करणे आवश्यक आहे असे सांगून मंडळाच्या कामाचे कौतुक केले.
स्वत:चं घर चालावं म्हणून दुसऱ्यांच्या घरांत धुणी-भांडी,झाडलोट,स्वयंपाक करणाऱ्या महिलाचां साडी चोळी देऊन सन्मान करून मंडळाने खऱ्या अर्थाने स्त्री नारी शक्तिचा जयजयकार केला आहे.
घरगुती अडचणींमुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च झेपत नाही म्हणून अनेक महिला आपल्या मुलांना शाळेत पाठवित नाही ही वास्तवता ओळखून मंडळाने त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन माणुसकीचा धर्म जपला आहे.
याप्रसंगी ५५ महिलांना साडी चोळी देऊन गौरविण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजित गोवे,नंदाताई ओमणे,माजी अध्यक्ष शरद हेंबाडे,दत्तात्रय जावळे,शिवाजी नागणे,शामराव जठार,दिलीप वाडेकर,समाधान डोंगरे,संभाजी नागणे,सिद्धेश्वर डोंगरे,अजित गांडुळे,विजयराज कलुबर्मे,संतोष डोंगरे,रोहित जठार यांचेसह मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते माजी अध्यक्ष प्रा.विनायक कलुबर्मे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
यावेळी उपक्रमास मंडळाचे गणेश ओमने यांचे विशेष सहकार्य लाभले.