मंगळवेढा:-
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यावतीने बायोटेक्नॉलॉजी विभागाने अवशेष मुक्त शेती : नवीन विचार या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रा. लि. पुणे चे सीईओ अजय आदाटे यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रण देण्यात आले होते.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे अजय आदाटे यांनी विद्यार्थ्यांना सुमारे दोन तास अवशेष मुक्त शेती या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली..
शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येणाऱ्या काळात अवशेष मुक्त शेती करणे फायदेशीर ठरणार आहे. तसेच पारंपारिक शेती, रासायनिक शेती या शेतीपेक्षा अवशेष मुक्त शेती ही कशाप्रकारे वेगळी आहे, हे अजय आदाटे यांनी सांगितले.
आदाटे यांनी त्यांच्या व्याख्यानात वेगवेगळी उदाहरणे, फॉर्म्युले,प्रोजेक्टरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना दाखवत ॲग्रीकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड शेतीविषयक करत असलेल्या कामाबद्दल ही माहिती दिली.
तसेच अजय आदाटे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मी सावित्री एक महायोद्धा हे पुस्तक भेट दिले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या हेड प्रोफेसर ज्योती जाधव या होत्या, तर प्रास्ताविक सहाय्यक प्राध्यापिका डॉ.दीप्ती कुऱ्हे केले आणि आभार सहाय्यक प्राध्यापिका डॉ.सुषमा पाटील यांनी मानले.