सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मूकबधिर व मतिमंद मुलांना भरविला मिष्ठान्नाचा घास. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५

सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मूकबधिर व मतिमंद मुलांना भरविला मिष्ठान्नाचा घास.


मंगळवेढा:-

मंगळवेढा येथील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सप्तशृंगी नवरात्र मंडळाने मंगळवेढा येथील करुणा मतिमंद व मूकबधिर शाळेतील सर्व मुलांमुलींच्या तोंडी मिष्टान्नातून घास भरवीत खरा देवीचा उत्सव साजरा केला आहे.


मूकबधिर व मतिमंद शाळेतील निराधार मुलांच्यापर्यंत जाऊन आपला आनंद समाजातील वंचित घटकाबरोबर साजरा करणे हाच खरा नवरात्र उत्सव आहे हेच आपल्या कृतीतून सप्तशृंगी मंडळाने दाखवून दिले आहे. 


आनंदाने चमकणारे मुलांचे डोळे आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य हेच या सामाजिक उपक्रमाचे यश ठरले असुन सर्व स्तरातून मंडळाचे कौतुक होत आहे.


सप्तशृंगी मंडळाचा नेहमीच सर्वच मुलांना आधार असतो त्याबद्दल शाळेच्या वतीने मंडळाचे आभार मानण्यात आले.


यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजित गोवे,माजी अध्यक्ष दत्तात्रय जावळे,शिवाजी नागणे,शरद हेंबाडे,दिलीप वाडेकर,विनोद सावंत, विजयराज कलुबर्मे,समाधान डोंगरे,संभाजी नागणे,प्रा धनाजी गवळी,संदिप सावंजी,विनोद नागणे,रणजित चेळेकर,सिद्धेश्वर खटकळे,ऋतुराज भगत,रोहित जठार, सुधीर नागणे,सिद्धेश्वर डोंगरे,गणेश ओमने,श्रीरंग शिंदे,ओम खटकाळे,श्याम माने,सोमा सपाटे,विवेक भोसले,रणजित जावळे,प्रा.विनायक कलुबर्मे यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक विदयार्थी उपस्थित होते.

test banner