सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

 


मंगळवेढा:-

सप्तशृंगी नवरात्र मंडळाच्या वतीने देवीच्या मंदिरात सामाजिक उपक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.


सदर आरोग्य तपासणी शिबीरामध्ये नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयू डॉ.निखिल कोडलकर एमडी मेडिसिन,डॉ.राहुल शेजाळ यांनी शुगर,बीपी तपासणी तसेच इसीजी काढून औषधोपचाराचा सल्ला देऊन समुपदेशन केले.


गरजूंना लाभ व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने आरोग्य शिबिराच्या माध्यमातून उत्तम सेवा करण्याचे काम केले आहे.


बदलती जीवनशैली,पोषक आहाराचा अभाव या बाबींचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे.त्यातच सतत तणावात राहिल्यामुळे देखील नकळतपणे काही आजारांची लागण होत आहे हे टाळण्यासाठी तणावाचे व्यवस्थापन आणि तणावमुक्त जीवनशैली अंगिकारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असून,निरोगी आयुष्यासाठी व्यायाम महत्वाचा असल्याचे डॉ.निखिल कोडलकर आणि डॉ.राहुल शेजाळ यांनी सांगितले.


सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयूचे विशेष सहकार्य लाभले.

test banner